फाल्कन हेवी नावाच्या रॉकेटसोबत पाठवलेली टेस्ला कारला बाहेर काढून मंगळ आणि पृथ्वीच्या मधल्या कक्षेत स्थापित व्हायचं होतं. पण रॉकेटमधून निघताना ही कार अडकली आणि आकाशात चुकीच्या रस्त्यावर गेली. स्पेसएक्स कडून लॉन्च करण्यात आलेल्या फाल्कन हेवी रॉकेटचं वजन जवळपास ६३.८ टन आहे. हे वजन जवळपास स्पेस शटलच्या वजनाच्या बरोबरीत आहे. या रॉकेटमध्ये २७ मर्लिन इंजिन लावले आहेत आणि याची लांबी २३० फूट आहे. हे रॉकेट एका २३ मजली इमारतीच्या उंचीसारखं आहे. स्पेसएक्सचे मालक एलन मस्क म्हणाले की, ही कार आता सध्या इतर छोट्या ग्रहांजवळ आहे.ही कार पुढे ढकलण्या साठी ज्या इंधनाचा विस्फोट व्हायचा होता, तो योग्य पद्धतीने झाला नाही. त्यामुळेच ही कार मार्ग भरकटली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews